Monday, January 26, 2015

तो आणि ती …. भाग - १

मित्रहो आणि प्रिय मैत्रिणींनो,
          मित्र आणि मैत्रीण हे नात आणि ह्या नात्याचा अर्थ शोधणारे माझ्यासारखे, तुमच्यासारखे! जीवनातील प्रत्येक वळणावर कळत नकळत नाती जुळवत तर काही आठवणीत ठेवत पुढे पुढे, नात्यांच्या न संपणाऱ्या अश्या प्रवासात सोबती बदलत चालत असतो. भारावून जाऊ नका, घाबरूही नका जास्त बोर नाही करणार मी तुम्हाला; "नाम मैं क्या राख हैं।" हे ब्रीद वाक्य म्हणायला हरकत नाही या गोष्टी बाबत. अर्थात नावातच सगळ काही असत हो, "नाम मैं क्या राख हैं।"  हे ब्रीद वाक्य म्हणून गेलेले महान झाले ;  आणि आज तू किंवा मी बोललो असतो तर कोणी भीक घातली असती का? sorry हा एकदम  एकेरीवर आलो.
          हो आता हेच बघा ना, आपण कितीही प्रयत्न केला तरी एखाद्याच आपल्या बद्दलच मत बदलू शकत नाही. किंबहुना तस झालाच तर भरपूर उशीर झालेला असतो. त्यामुळे जशी व्यक्ती महत्वाची, तीचे मत महत्वाचे  तसे त्या व्यक्तीचे नावही.
          ह्या संपूर्ण प्रस्तावनेचा पुढील कथानकाशी काहीही संबंध नसला तरी मी जे काही बोललो त्याचा अनुभव आपल्या पैकी काहींना आलाच असेल. नसेल तर येईल हो; आयुष्य फार मोठ आहे कधीना-कधी, कुठेना-कुठे अशी काही माणस भेटतील जी बदल घडवतील.
कारण CHANGE IS THE ONLY CONSTANT THING IN LIFE........

          चला, कथानक हे मधुरा आणि निलेश ह्या दोन मित्रांबद्दलचे; व्यक्ती, मत, नावं ह्यांना किती महत्व द्याव आणि कस द्याव ह्या किचकट विषयाला छेडणार आहे. किचकट अशासाठीच, कारण मधुरा-निलेश एक मुलगा-एक मुलगी मित्र असू शकतात?
नाही-नाही हा तुमचाच नाही तर त्या दोघांचाही प्रश्न आहे.
उत्तर म्हणाल तर ; ते शोधात आहेत हो. बघूया कोणाला मिळत उत्तर!
तुम्हाला की, ह्या दोघांना.?????
          हम्म्म्म ! थोडीशी तोंड-ओळख करून देतो. निलेश, माझा Best friend  आणि मधुरा त्याची मैत्रीण (nothing more than that) हे असच दोघे नेहमी म्हणायचे आणि अजूनही त्यांचे तेच मत आहे.  मलाही सांगता नाही येणार हो, तुम्हीच ठरावा काय ते. मी नेहमी तटस्थ भूमिकाच घेतली निलेशच्या बाजूने; कारण मला जे काही माहित आहे ते सगळे निलेशचे, एका मुलाचे मत होते.
          एखाद्या नात्या-बद्दल बोलायचे झाले की मुद्दा मांडताना निलेश निलेश नसायचा, चौकस विचार करून अगदी पटेल अस बोलायचा. मधुरा exactly opposite कधी काय बोलाव, कस वागाव काहीच न कळणारी. पण बाता मात्र एकदम mature असल्यासारख्या. डोक्यापेक्षा मनाचे पारडे जड ठेवून निर्णय घेणारी. अशे हे दोन मित्र. निलेश मोठा असल्यामुळे म्हणा किंवा मोठे असल्याचा पूर्ण फायदा घ्यायचा म्हणून सल्ले द्यायचे काम तो ह्या मैत्रीमध्ये अगदी चोख पार पडत होता. त्याची एक इच्छा तो नेहमी बोलून दाखवायचा, "यार एक मैत्रीण हवी." जी फक्त माझी मैत्रीण असेल. Girl-friend (मैत्रीण) & Lover  (प्रेयसी) हे जशे दोन शब्द, त्याअर्थी व्यक्ती पण दोन वेग-वेगळ्या असाव्या असे त्याचे मत. योग्यच आहे कि नाही? काय म्हणता?
          कॉलेज मधील तरुणाईत काही तरी वेगळ करून दाखवायची ओढ लागलेली असते, मग ते क्षेत्र कोणतही असो. निलेशच नकळतच ठरलं; एक मैत्रीण असावी म्हणून. तशी व्यक्तीही भेटली ज्युनिअर कॉलेज मधली मधुरा. एकाच स्ट्रीम मधली असल्यामुळे notes & guidance ह्यामधून सहवास आणि मैत्री वाढू लागली. already प्रेमात पडलेली मुलगी पुन्हा प्रेमात कशी पडेल??? ह्याची खात्री दोघांनाही. (थांबा , तुम्ही तर लगेच निश्कर्ष काढला पण ? अहो जरा धीर धारा कि).  मधुरा, निलेशशी ह्या विषयावर बोलायचे टाळायची पण काही problem झाला की मधुरा नेहमी निलेशजवळ येऊनच मन हलक करायची. मौज-मस्ती, दुखन पुसण चालूच होत. PG साठी निलेशने कोलेज सोडलं. भेटी कमी झाल्या, पण रोज सकाळी ठरलेल्या वेळी बोलन न झाल्याशिवाय दोघांच्याही दिवसाची सुरवात नाही व्हायची. फक्त एक-मेकांचे HELLO ऐकले तरी समाधान! एवढी जवळीक कि, मी आणि निलेश कधी भेटलो तर त्याचे मधुरा पुराण थांबयाचेच नाही. खास मैत्रीण आहे यार आपली, तुला कोणी भेटली तर तुलाही कळेल. असे म्हणायचं!
मी पण काय ठीक आहे बाबा म्हणून विषय सोडून द्यायचो.
          कॉलेज फेस्टचे दिवस जवळ येत  होते, निलेशने मला विचारले ह्या वर्षी काही नवीन events आहेत का ते! नवीन तर तसे काहीच नव्हते; मात्र निलेशच्या डोक्यात काहीतरी खास होते. फेस्टच्या पहिल्याच दिवशी मला निलेशचा  फोन आला. माझे submissions ही त्याच दिवशी असल्याने मी गडबडीतच होतो. कॉलेज ID शिवाय कोणालाही अश्या दिवसात entry मिळणे कठीण असायचे याची जाणीव निलेशलाही होती तरी तो माझी  वाट बघत उभा होता. मी एका Lab Assistant ला पकडले आणि निलेशला entry मिळवून दिली. एवढ काय महत्वाच काम होत त्याच कोणास ठऊक.
मधुराला भेटायचय वाटत? , मी विचारलं !
"हो, पण तिला माहीत नाही आहे कि मी इथे आलोय ते!"
त्या नंतर मी  फक्त निलेशच्या प्रश्नांची उत्तर देत होतो आणि  थोड्याच वेळात …
ती बघ मधुरा!
माझे तोंड थोड्या वेळेसाठी उघडेच राहीले. निलेशने संपूर्ण campus  मधली नेमकी जागा आणि व्यक्ती फक्त 15 मिनीटात शोधली. मधुरा-निलेश एक मेकांसमोर उभे होते; मी लांबूनच हे सगळ द्रुष बघत होतो. मधुराच्या चेहऱ्यावर अविश्वसनीय आनंद ( आच्छर्य ) आणि निलेशची रोखलेली नजर बघून मी तिथून काढता पाय घेतला. जेम तेम अर्धा तास झाला असेल, दोघे मला येऊन भेटले, काहीतरी भयानक कृत्य करून आल्यासारखे भाव होते दोघांच्या चेहऱ्यावर.
काय?
कोणी सांगेल मला काय झालाय ते ? PLEASE!!!!
बावचळत, निलेशने सुरवात केली.
अरे, ३-४ मुलांनी घेरल मला दुसर्या मजल्यावर आणि हिला वर्गात जायला सांगीतलं.
कोण तू? इकडे काय काम? मधुराला कसा ओळखतो ?
पूर्ण पोलिस तपास झाला माझा.
म्म्म्म्म!, माझी सगळी इंद्रिय एकदम ACTIVE झाली.  
हिलाच विचार, काय झाल ते….
मधुरा ??
अरे , तो आपल्या कॉलेज मधला weight lifter प्रवीण आहे ना , तो आणि त्याचे मित्र माझ्या batch मधले अशी ४-५ मुल होती.
अग पण तुम्हा दोघांची एवढी चौकशी मागच काहीतरी कारण असेल ना, आणि तुम्हीच का??
त्या प्रवीण ने मागे मला propose केल होत;मी नाही सांगितलं त्याला तर तेव्हा पासून माझ्याशी बोलणाऱ्या प्रत्येक मुलाला तो असा घाबरवतो.
निलेश मध्येच पचकला - घाबरवतो काय, आणि हे आत्ता सांगतेय ही!
ओ हिरोलाल, आधी सांगितलं असत तर काय केल असत रे निल्या तू? मी थोड निलेश ला आवरायचा प्रयत्न केला…
मी काय केल असत म्हणून काय विचारतोस,       आलो नसतो ना मं मी  ! (हा हा हा हा)
गंभीर वातावरण थोड रुळावर आल, निलेश च्या अश्या मिश्किल स्वभावामुळे मुली impress होतात अस वाटल मला आणि ते पुढील काही दिवसांमध्ये (किंबहुना वर्षांमध्ये) पक्क हि झाल !
असा हा रोमहर्षक दिवस संपता-संपता मी निलेश ला विचारले, काय रे तुझ्या डोक्यात काय चालू आहे काही कळेल का?
डोक्यात काही नसत रे , जे काही असत ते मनात असत !
मं, कोण आहे कोण मनात? मधुरा ना ?
नाही रे, फक्त मैत्रीण आहे ती.  आणि मुख्य म्हनजे ती आधीच प्रेमात पडली आहे! मी बोललो होतो ना मागे तुला, जय नाव आहे त्याच.
होका??? आज जो पराक्रम तू केलास आणि जी दाद मिळाली त्यावरून वाटत नाही मला कि अस काही असेल म्हणुन; सांग हीच न ती?
मी अगदी खात्री केल्याशिवाय सोडणार नव्हतो निलेश ला आज आणि हे बहुतेक त्याने हेरल होत म्हणून कि खरच तस नाही म्हणून त्याने एक नाव घेतलं.
नंदिनी, नंदिनी आवडते मला! तो पटकन बोलून गेला.
अरे!!!!! मला काय बोलू आणि काय नको अस झाल!
जाऊदे, सोड तुला नाही कळणार! म्हणत निलेश ने विषय बदलला.

           मी संभ्रमात होतो, की निलेश!  हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न नाही केला. कुठेतरी चुकतंय ह्याची जाणीव मात्र होत होती. ही फसवणूक नव्हती, पण एक भावनिक गुंतागुंत; भविष्यात ह्याचा त्रास कोणाला किती होईल हे न सांगता येण्यासारखे होते. निलेशच मधुरा पुराण चालूच होत! त्या दरम्यानच जय आणि निलेश एकत्र आले. निलेश च्या कॉलेज मधील मित्राचा तो भाऊ. जय शी ओळख हा निव्वळ योग-योग, पण त्याचा त्रासच  निलेशला झाला. कारण जयच मधुरा बद्दलच मत काही चांगल नव्हत आणि हे त्याला कुठेतरी बोचत होत. आपली मैत्रीण ज्याला प्रेम मानते ते प्रेम नाही, हे सांगायचं कस? माझ्यासाठी ते सरळ होत, पण निलेश ला ते तितक सोप्प नाही वाटल. कारणही तसच होत. निलेश बोलत होता…
"मी तीला सांगेन रे, कि जय चांगला मुलगा नाही! पण पुढे काय? तिला पटेल का हे? तिला माहित आहे की मी खोट नाही बोलणार. माझाही हा अंदाजच आहे, जय ने काही स्वताहून मला तस सांगितलं नही. एकंदरीत जय बद्दल माझ झालेलं हे मत आहे, ते किती चूक कि बरोबर ह्याची चाचपणी कोणी करायची?  मी जास्तीत जास्त तिला एक कल्पना देऊ शकतो. बाकी काय ते वेळ आली की कळेलच तीला!"
          प्रश्नांची उत्तर मिळाली नाही की भावनांची आणि विचारांची कशी जुगलबंदी होते हे त्या काही दिवसात मला निलेशच्या बोलण्यातून सतत जाणवत होते. त्याने मधुराला नकळत एकंदरीत परिस्थिती काय आहे याचा अंदाज दिलाही होता; पण प्रेमात पडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यातून सावरायला.  मधुराला वास्तव कळून चुकल होत आणि मित्र म्हणून निलेश अजूनच जवळचा झाला होता. आता निलेश सांगेल तीच पूर्व दिशा अस काहीस झाल होत. नीलेशच आणि माझ भेटण थोड कमी झाल काही दिवस; मग म्हटलं निदान आठवड्यातून एकदा तरी भेटून गप्पा माराव्यात. दिवस ठरायला वेळ नाही लागला, दर शनिवारी संध्याकाळी चौकात २-३ फेऱ्या गप्पा मारत, मस्ती करत होऊ लागल्या. मधुरा हा विषय तर असायचाच! तिच्या शैक्षणीक गरजा काही करून पूर्ण करून द्यायच्या, बाकी सल्ले वेगळेच असा कार्यक्रम चालू होता सगळा. मधुराला एक चांगलाच मार्गदर्शक मिळाला होता. मी निलेशला प्रत्येक वेळी खात्री करून घेण्यासाठी विचारायचो, काय रे बाबा नक्की काही नाही तुमच?