Saturday, July 6, 2019

मीत्रांनो आणि प्रिय मैत्रिणींनो ,
           मीत्र - मैत्रीण ! ह्या नात्यामधील अर्थ उमगताना किंबहुना कोणताही ऋणानुबंध समजण्यासाठीचा हा एक संदर्भासहीत प्रयत्न, बघूया काही उमगतं का ते. आपण सारेच आयुष्याच्या वळणांवर नाती जुळवत, फुलवत, ती  आठवणींच्या गाभाऱ्यात जपुन ठेवत अखंड प्रवासात सोबती गाठत पुढे जात असतो. प्रत्येक वळणावर एका नवीन स्पर्धेला सामोरे जावे लागणाऱ्या ह्या जगात जिंकणे जितके गरजेचे आहे, तेवढेच महत्वाचे आहे की आपण या प्रवासात सोबती म्हणून ह्या स्पर्धकांमधुन कुणाला निवडतो. हे स्पर्धकच कळत नकळत का होईना आपण घडत असताना, यश-अपयश सामोरे जाताना, मार्गदर्शक, सल्लागार, आपली गुपीत जपणारा, सवंगडी अश्या अनेक भूमिक साकारतात. ह्यातूनच आपणास उमगतो तो एक मीत्र किंवा मैत्रीण. ही झाली माझी व्याख्या पण प्रत्येकाची त्या एका व्यक्ती बद्दलची व्याख्या अशीच असेल किंवा ती व्यक्ती एकच असेलअसे नाही. काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेत मला विचारण्यात आले, मित्राची व्याख्या काय; "जो मला मदत करु शकतो तो अथवा जो वेळे प्रसंगी माझ्या मदतीला धावून येतो त्याला मीत्र म्हणतात" हेच स्पष्टीकरण होते माझ्याकडे. 
भाराउन जाऊ नाक किंवा घाबरूही नका; जास्त क्लिष्ट संवाद नाही करता येत मला, पण नाती म्हटली कि थोडीशी गुंता-गुंत तर असतेच! मग ते नात कोणतही असो. आता  हेच बघा ना, कितीही प्रयत्न केला तरी एखाद्याच आपल्या बद्दल असणारे मत नाही ना आपण बदलू शकत. किंबहुना ते बदलावं अश्या दृष्टीने केलेला प्रयत्नही नात्यात दरी निर्माण करू शकतो.
हं!
संवाद जरा सोप्पा करूया, नाहीतर म्हणाल काय बोर करतोय हा!
बघितलं तर ह्या संपूर्ण प्रस्तावनेचा आपल्या पुढील गप्पांशी थेट संदर्भ नसला तरी आपण सर्वांनीच असे काही अनुभव घेतलेले असतीलच जे कायम आठवणीत राहतात! नाही? मग येतील हो! आयुष्य बरच आहे किंवा जरा आपल्या स्मरणशक्तीला चालना द्या. अश्या बऱ्याच व्यक्ती आपणास भेटत असतात ज्या कळत - नकळत  आपल्यात बदल घडवतात वा एक नवीन अनुभव देऊन जातात. "बदल! हा आयुष्याचा एकमेव असा स्थीर भाग आहे जो घडताना आपली मर्जी विचारात नाही." चांगला, आठवणी देतो तर वाईट, शिकवणं!
         
अशेच काही गोड, गंमतीदार किस्से निलेश आणि इरा ह्या मित्रांच्या आयुष्यात डोकावून बघूया. विषय तोच, एक मुलगा-एक मुलगी मित्र असू शकतात? ह्या प्रश्नाच उत्तर ह्यांनी कस शोधल?? ते त्यांना सापडल की त्यांनी आप आपल काय ते समजुन घेतल.   

निलेशच्या सवयीप्रमाणे, तो मैत्रीणीच्या शोधात होता. काही व्यक्ती आपल्या आजु-बाजुला सतत असतात पण त्यांच अस्तीत्व जाणवायला किंबहुना आपल्या वाटेतील त्यांच्या पाऊल खुणा उमगायला एका योग्य क्षणाची गरज असते. ह्या दोघांच्या बाबतीतही तसच झाल.

इरा-निलेश ह्यांच दहावी नंतरच सगळं शिक्षण एकत्रच, पण ११ वी ते पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षा पर्यंत हे दोघेही समांतर आयुष्य जगत होते. इरा, निलेश ह्या नावाच्या दोन व्यक्ती आहेत काय नी नाही काहीही फरक पडत नाही असं चालू होत. निलेशच्या थोड्याफार अभ्यासू आणि सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण असल्या कारणाने चर्चेचा विषय असायचा ( अर्थात चांगल्या आणि वाईट दृष्टिकोनाने). त्यावेळी वर्गात निलेश आणि देवेंद्र ही जोडी फुडे होती, गणिताच्या शिक्षिका ( ज्यांना आम्ही प्रेमाने आजी म्हणायचो) त्या तर वर्गात ह्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवून " नाही  बाळा,हे  प्रमेय अस नाही; तर अस सोडवतात!" असे चित्र होते. देवेंद्र आणि निलेश कडे मुल शंका निरसन करायला येऊ लागले होते. अश्याच एकदा ३-४ मुली, गणित परीक्षेत आलं की कस सोडवायचं हे विचारायला आल्या, त्यातली एक म्हणाली
निलेश, इराने शिकवण लावली आहे कॉलेज  व्यतिरिक्त तिथे हा प्रश्न विचारयलाय.
मिश्किल पने हसून निलेश बोलला.
५० मार्क साठी शिकवण कश्याला हवी आहे!
३६ मार्क ची प्रमेय येणार हे ठरलं आहे, सगळी प्रमेय व्यवस्तीत करून गेलो कि आरामात ३० च्यावर मार्क्स मिळतात.
असा सल्ला  देऊन निलेश बाजूला झाला.
कळत नकळत कदाचित ह्या दोघांनी एकमेकांबद्दल काहीतरी मत बनवल असणार त्या दिवशी एवढ मात्र खर. तोंड ओळख तस म्हटल तर वाईटच होती; असो! आपल्याला कुठे रोज-रोज भेटून गप्पा मारायच्या आहेत ह्या आवेश्यात दोघेही आपल्या पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षात येऊन पोहचले. संगणक विज्ञान ह्या विषयात पदवी मिळवण्यासाठी सगळ्यांची जोरात तयारी चालु झाली, बरोबरीने कॉलेज मधील इतर स्पर्धा आणि कार्यक्रम पुन्हा होणे नाही हे ध्यानात घेऊन वातावरणही तसे उत्साही होते प्रत्येक वर्गामधुन विविध स्पर्धांसाठी उमेदवार निवडायची जबाबदारी वर्ग शिक्षिकेची होती. गायन स्पर्धेसाठी इराने नाव दीले, कारण शास्त्रीय संगीताचा चांगला अभ्यास तीच्या पाठीशी होता. मुलांमधुन कोण? २-३ जणांनी प्रयत्न केला, त्यात निलेशने गाण गाऊन वर्ग शिक्षीकेला रडवल आणि स्वतःची निवड करुन घेतली. म्हणजे एकदम भावना ओतल्या हो गाण्यात. परंतु ऐन स्पर्धेच्या दिवशी निलेश आजारी पडला, त्यामुळे तो बाद; इरा पण स्पर्धेत सहभागी नाही झाली. कारण, माहिती नाही बुवा! हा, पण आम्हा मुलांना निलेशला छळायला विषय मिळाला.
बघ निलेश, तू नाही आलास तर इरानेही स्पर्ध्येत सहभाग नाही घेतला!
ह्या असल्या चर्चा जेवढ्यास तेवढ्या कश्या ठेवायच्या हे निलेशला चांगलेच माहीत होत.
चांगलं आहे! बोलून, देवेंद्र सोबत पुढच्या तयारी लागला.

पदवीच्या शेवटच्या वर्षातील प्रोजेक्ट करण्यासाठी सगळेच जोमाने तयारीला लागले; जोडीदार निवडणे, विषय ठरवणे आणि प्रोजेक्ट पूर्णत्वाचे टप्पे व्यवस्तीत मांडुन कामाचे वेळा पत्रक ठरवणे ह्या सगळ्या प्रक्रीयेत निलेश आणि देवेंद्र सर्वात पुढे तर होतेच, शिवाय टाप - टीप पण आणि मुद्देसूद मांडणी पाहून वर्ग शिक्षिकेने तर ह्या दोघांचा आदर्श घेऊन काम झालं पाहिजे अशी ताकीद दिली सर्वांना. अती उत्साही निलेश आणि देवेंद्र ह्यांची मित्रांकडून चांगलीच पाठ थोपटनी व्हायची!
अभ्यास, मस्ती, पिकनीक चे प्लॅन संपूर्ण वर्गाला एकत्र घेऊन आले होते. एक दिवस कॉलेज ला दांडी मारून मस्त एकत्र भटकंती करायचं ठरलं ही होत; त्या प्रमाणे सगळे जण भेटलेही. परंतु इरा, तिची खास मैत्रीण भार्गवी आणि अजून ३-४ जणी वर्गात जाऊन बसल्या. ह्या प्रसंगांमुळे थोड वातावरण चिघळलही, देवेंद्रने संपूर्ण वर्गासमोर बोलणी तर ऐकून घ्यावी लागलीच, शिवाय प्राध्यापकांकडून माराही खावा लागला.
हा-हा म्हणता वर्ष संपत आले!
निलेश आणि देवेंद्रने प्रोजेक्ट पूर्ण करून कामाची सगळी कागदपत्रे जमा केली. प्रोजेक्ट मधील अतिशय महत्वाच्या टप्प्याची रचना पूर्ण करण्यात काहींना कठीण जात होते. इराने पुढाकार घेऊन निलेश ला विचारले!
आम्हाला तुझ्या प्रोजेक्टची प्रत मिळेल का?
आम्ही ४-५ जणी येतो तुझ्या घरी आणि आम्हाला जे हवे तेवढ संदर्भासाठी घेतो कॉपी करून तुझ्या प्रोजेक्ट मधल. लेक्चर्स संपल्यावर ५ मुलींचे पथक निघाले निलेशच्या घरी. आधी बस आणि पुढे पायी असा प्रवास होता खरा पण ह्या प्रवासातील जोखीम त्या मुलींना माहीत नव्हती. पदवी नंतर पुढे काय, कोणते पर्याय विचारात घेऊ शकतो अश्या गप्पांच्या नादात निलेशही पूर्व कल्पना द्यायला विसरला. बस मधून उतरल्यावर निलेशने रेल्वे स्टेशन गाठले.
इरा - काय रे तू तर इकडेच राहतोस ना? म, रेल्वे स्टेशन वर काय आहे आपल?
निलेश - अग! हा शॉर्ट कट आहे, चला! प्लॅटफॉर्म संपला कि खाली उतरून बाजूच्या पाय वाटेनं आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये जाता येत!
काय निलेश, मुली पहिल्यांदा तुझ्या घरी येत आहेत आणि तू सरळ मार्गाने न्ह्यायच तर इकडून कुठून? पथकातून एकीने निलेशची मजा घ्यायचा प्रयत्न केला....
मुलींना लवकर घरी न्हेतोय, उशीर नको ना!
प्लॅटफॉर्म संपल्यावर एक ३-४ मिनिटांसाठी रुळावरून चालायचे होते. ट्रेन आलीच तर ती समोरून, तसा अंदाज घेऊन आणि फलाटावरील ट्रेन ची वेळ, निलेश ने आधीच बघितली होती. त्यामुळे त्याने सांगितले आपल्याकडे वेळ आहे चला पटकन.
इरा- आम्ही घरी सांगून आलोत की निलेशच्या घरी जातोय, त्यामुळे काही झालं तर तुलाच पकडणार आमच्या घरचे.
निलेश - हो का! मग, काही व्हायची वाट बघायची आहे का चालायच पटापट, ठरवा तुम्हीच.
निलेशसाठी ती नेहमीचीच वाट होती, तसा तो पुढे झाला. मुली मात्र थोड्या घाबरत, धडपडत रुळातुन निलेशच्या वेगाशी जुळवुन घेत होत्या. वाट संपली तश्या पथकातील तिघी जणी बाजूला जाऊन उभ्या राहिल्या इरा आणि भार्गवी साठी. तेवढ्यात एक जोरात हाक ऐकू आली.
निलेश!
इरा जिवाच्या आकांताने ओरडली, कारण समोरून ट्रेन येत होती.
अरे चला लवकर लांब आहे ट्रेन आणि वेग फारच कमी आहे काहीही होणार नाही, चला या!
निलेशने धीर द्यायचा प्रयत्न केला. इरा आणि भार्गवी त्याच वेगाने बाजूला आल्या आणि ट्रेन अजूनही तितकीच दूर होती.
अश्या रोमांचक अनुभवाने निलेशच्या घरी पोहचून पथकाने प्रोजेक्ट मोहीम फत्ते केली. निलेशने अश्या मार्गाने न्हेल की कोणालाच लक्ष्यात राहणार नाही की निलेश राहतो कुठे, असा टोमणा मारायला इरा चुकली नाही.  
३-४ दिवस चर्चा चालली; निलेशच्या घरी ५ मुली गेल्या होत्या म्हणे! असो, तर ही होती निलेश आणि इराची पहिली जुगल-बंदी. इराने निलेश ला मारलेली ती हाक म्हणजे आपुलकी आणि विश्वासाची नीव रोवणारी होती, कारण  हा किस्सा मला सांगताना निलेशने केलेली इराची नक्कल आणि  झाला प्रकार मला सांगताना रमलेला निलेश बघून एवढं तर नक्की पटल की ही जोडी मजेदार आणि एकदम पक्की असणार. पदवी नंतर पुढे भेट होईल न होईल ह्या उद्देशाने वर्षा अखेरीस सगळ्यांनी निरोप घेतला खरा पण संपर्कात राहु अश्या आशेने. एव्हाना, निलेश आणि इरा निकालानंतर काय ह्या संदर्भात कधी कधी फोनवर चर्चा करत होते कारण मास्टर्स करायचंय असं जवळ जवळ संपूर्ण वर्गाचाच मत होत. त्यामुळे विविध प्रवेश परीक्षांची (एम.सी.ए) माहिती एकमेकांना दिली जात होती. पदवी परीक्षेचा निकाल निलेशसाठी काही आशादायी ठरला नाही, त्यामुळे संपूर्ण भीस्त आता प्रवेश परीक्षेच्या निकालावर होती. मास्टर्स करायच हे  नक्की होत; एम.अस.सी. साठी निलेशने ऍडमिशन घेतले सोबत शिकवण्याही घेण्यास सुरवात केली. नियमीत अभ्यासाबरोबर उजळणी व्हावी आणि नोकरीसाठी तयारीही. येव्हाना एम.सी.ए पदवी परीक्षेचा निकालही लागला. मुंबई विभागाचा कट ऑफ ७ गुणांनी हुकला होता निलेशचा; तरीही रीक्त जागा असणाऱ्या महाविद्यालयात ऍडमिशन होईल आशा होती. १-२ महाविद्यालयात निलेश जाऊनही आला परंतु डोनेशन शिवाय प्रवेश नाही म्हणून निलेशने तो विचार सोडून दीला आणि एम.अस.सी. चालू ठेवलं.
२-३ महिने उलटले, एक दिवशी  निलेशला इराचा फोन आला
अरे! माझ्या कॉलेज मध्ये एम.सी.ए साठी रिक्त जागा आहेत; भार्गवीने तीच पुण्याचं ऍडमिशन कॅन्सल करून इकडेच घेतलं आहे, तू एकदा येऊन चौकशी कर कॉलेज मध्ये.
नियतीने एका प्रयोगाच्या रंगीत तालीमीसाठी व्यासपीठ तयार केल होत, पात्रांची गोळा-बेरीज, कथानक लिहिलं जाणार होत; अर्थातच ह्या कथानकात इराची बाजूही निलेशच्या सांगण्यातून मला समजली. मात्र निलेश ह्यापात्राचे मत आणि त्याला उमगलेले नाते, बघूया कस काय फुलतंय ते!

इरा-निलेश तस बघितल तर दोन भिन्न प्रवृत्तीची माणस; इरा भरपूर बोलणारी, सडे-तोड किंवा थोडी फटकळ ( म्हणजे मनात काही ठेवायच नाही). एखादी गोष्ट नाही आवडली, नाही पटली तर सरळ बोलून मोकळी होणारी. ह्याच्या अगदी विरुद्ध निलेश; कमी बोलण, समोरच्याला आवडेल- न आवडेल ह्याचा विचार करणारा. त्यामुळे मोजकच बोलणारा, पण कधी-कधी थोडा मिश्कील. परंतु, इराच्या मोकळ्या स्वभावामुळे तो तिच्याशी भरपूर बोलायचा. समीकरण बर जमल होत. नवीन कॉलेज, नवीन वर्गमित्र जुळवुन घेता-घेता निलेश,इरा-भार्गवी हे त्रिकुट एकत्र येत होत. रिमझीम पावसात मस्त खुस-खुशीत कांदा भजी बनवताना कांद्याला उकळत्या तेलात जाव लागत तसच काहीस निलेश-इराच्या बाबतीत झाल. त्या दिवशी निलेशला कॉलेजला पोहचायला उशीर झाला होता. वर्गात बॅग ठेवून इरा, भार्गवीच्या शोधात तो लायब्ररी फिरून आला. तेवढ्यात भार्गवीने निलेशला गाठले.
निलेश! जरा लॅबमध्ये चल.
काय ग, काय झाल? इरा कुठेय?
तु चल आधी!
इरा लॅबमध्ये तीचा मेलबॉक्स बघत होती.
निलेश, हा काय फालतुपणा आहे? कोणीही उठुन, विचार न करता अस काहीही लिहितात का?
क्षणभरासाठी निलेश दचकला, नजर खिळवून तो भार्गवीच हे अस रौद्र रुप निहारत राहीला; नेहमी हळुवारपणे बोलणाऱ्या त्या नाजुक जीवातून आज असे तीक्ष्ण वार होत होते. भार्गवी चांगलीच संतापली होती.
काय झालं आहे हे कळायच्या आधीच निलेशवर इरानेही प्रश्नांचा भडीमार केला.
देवेंद्रला मी फक्त माझ्या वर्गातला एक मुलगा एवढच ओळखते, कधी बोलणं नाही काही नाही आणि हे सगळं काय आहे. त्याच्याकडे माझा इ-मेल आयडी कसा गेला? तू दिलास ना?
निलेशने नजर कॉम्पुटर स्क्रिनवर टिकवली; मागून इरा आणि भार्गवी निलेशवर ताशेरे ओढतच होत्या.
एव्हाना झाला प्रकार निलेशला कळला होता.
देवेंद्रने इराला प्रेम पत्र लिहिल होत.
हे निलेशलाही तेवढच धक्कादायक होत.
देवेंद्र अस काही करणार नाही ह्याची खात्री निलेशला होती. परंतु; हे घडल होत.
हे बघा! मला ३-४ दिवस द्या मी बोलतो देवेंद्रशी आणि हे सगळं काय प्रकरण आहे ते बघतो. कारण, आम्ही तस वरचे वर भेटतो पण असल काही मलातरी देवेन्द्रच्या बोलण्यातुन नाही जाणवलं. किंबहुना, मी जेवढ देवेंद्रला ओळखतो त्यावरून तो असेल काहीकरणार नाही ह्याची मला शाश्वती आहे. 
हा तुमच्या दोघींचा विषय असतो पण तो तेवढ्या पुरताच. जास्त खोलात किंवा काही विशेष टिपण्या नाही.
मी बघतो!
आणि, राहील इराचा इ-मेल आयडी बद्दल! तर तो सगळ्यांकडे आहे आपल्या जुन्या कॉलेज मध्ये. कारण आपण मेल्स फॉरवर्ड करतोय गेले ७-८ महिने संपूर्ण वर्गाला एकत्र. बाकी मी बोलतो देवेन्द्रशी!
निलेशने तातडीने देवेंद्रला गाठले आणि झाल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा कळले की, देवेन्द्राच्या वर्गातील एकाने बोगस इ-मेल आयडी बनवला देवेन्द्राच्या नावाचा आणि इराला मेल केल. हे मला पटल कारण त्यांच्या कॉलेजमध्ये अजून दोघांच्या बाबतीत त्या मुलाने अस केल हे निलेशला एका दुसऱ्या मित्राकडून कळल. आता प्रश्न एकाच होता की हे इराला कस समजवायच.
निलेशने २-३ वेळा प्रयत्न केला.
हे बघ इरा मला जेवढ कळल ते मी तुला सांगितल आणि ह्या सगळ्या मध्ये मी कुठेही सहभागी नव्हतो.
मग त्या मुलाने मलाच इ-मेल का केल?
मी देवेन्द्रच्या कॉलेज मध्ये गेलो होतो ऍडमिशनसाठी त्यावेळी माझी त्या ग्रुपशी ओळख झाली आणि नंतर मी इकडे ऍडमिशन घेतल. तेव्हा कधीतरी तुझा उल्लेख केला असेन मी बोलता-बोलता आणि आपले मेल्स सगळ्या कॉलेज मध्ये फॉरवर्ड होत असतात; त्यामुळे सोप्प आहे तुझा इ-मेल मिळवण.
देवेन्द्र तुझा मित्र आहे, त्यामुळे मला हे अजिबात पटल नाही आहे आणि तुही त्यातलाच.
झाल्या प्रकार बद्दल निलेशला दोशी ठरवण्यात आल होत.
इरा, मला नाही वाटत की मी माती खाल्लीय. बाकी तु बघ!
मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे!  इरा संतापून बोलली. निलेशनेही विषय सोडून दीला. ह्या विषयावरच काय तर इतर कोणत्याही बाबतीत निलेशने इराशी बोलणे बंद केले. आता कुठे मैत्री होत होती आणि सगळ फिस्कटल होत. ह्या मध्ये ना इराचा काही दोष नाही निलेशचा; दोघेही आपापल्या जागी योग्य. काही दिवस निघून गेले,  अबोला मात्र कायम होता.
मी तीला येवढ महत्व का देतो आहे! मला काहीही फरक पडत नाही, इरा नावाची मैत्रीण असली तरी किंवा नसली तरी. जेव्हा कळेल तीला तेव्हा येईल स्वतःहुन!
निलेश मला सांगत होता कि स्वतःची समजूत काढत होता मला काही कळल नाही त्यावेळी. हा एवढ मात्र नक्की की हे साहेब काही आता बोलायला जाणार नाहीत. पुढाकार इरालाच घ्यावा लागणार होता. छे! छे! तिची चुकी होती वगैरे, तसल नाही! पण निलेशचा स्वभावच तसा होता आणि इराचाही, पुढाकार घेतल्याशिवाय ती राहणारी नव्हती. इराने हात मिळवणी केली आणि गाडी पुन्हा रुळावर येऊ पाहत होती; निलेशसाठी हे थोड कठीण होत कारण ह्यावेळेस त्याला मतभेदासाठी वाव द्यायचा नव्हता. त्यामुळे वागण्या-बोलण्यातील आधीसारखी साहजिकता येईस तोवर त्याने वेळ घेतला. पुन्हा एकदा अभ्यास-परीक्षा, सोबत येण-जाण ह्या प्रक्रियेत निलेशच सततच सावली सारखं इरा सोबत असणं, तिला सल्ले देण, तिच्यावर रागावण चालू होत. एके दिवशी संध्याकाळी घरी जाताना काहीतरी खाऊन निघुया अस म्हणत सगळे जण हॉटेल मध्ये घुसले. इराने ज्युस ऑर्डर केल.
दुपारी तुला खोकला होता आणि बर वाटत नव्हतं, ज्युस कसल पिते आहेस! दुसर काहीतरी खा!
निलेशचे हे शब्द ऐकताच इराने एक कटाक्ष टाकला.
इराच्या त्या रोखलेल्या नजरेत पाहुन निलेश सहजच बोलून गेला, काय?
काही नाही! म्हणत इराने प्रसंगावधान राखले कारण अजूनही बरीच मंडळी होती तेव्हा. निलेश मात्र,काहीतरी बिनसलंय, तब्येत बरी नसल्यामुळे असेल बहुदा असे मानून त्यानेही खोलात जायचा प्रयत नाही केला. पुढच्या भेटीत मात्र निलेशला झालाय प्रकरणाची खोली किती होती, इराच्या मनात काय चालल होत ते तीच्या सडेतोड, स्पष्ट वक्तव्यातून समजून चुकले.
काय रे निलेश, तुला एवढी प्रत्येक वेळी माझी काळजी करायची गरज आहे अस वाटत का?
मला चांगल समजत माझ्यासाठी काय योग्य आहे आणि मी कधी काय केलं पाहिजे ते!
म्हणजे? मी कधी तुला रोखलय?
इराने, झाल्या प्रसंगाची आठवण करून दिली.
अच्छा! ते होय!
ते तर मी सहजच बोलून गेलो, तुझी तब्येत म्हणुन!
निलेश, पण तुला अस नाही वाटत का की तू जरा माझ्या बाबतीत जरा जास्तच काळजी दाखवतो आहेस?
असेल कदाचीत! मला जी माणस जवळची वाटतात, मित्र वगैरे त्यांच्याशी मी असाच वागतो. तुला विशेष वाटु शकणं साहजिक आहे कारण ह्या सगळ्यांमध्ये आपण अधिक मोकळे पणाने वागतो एकमेकांशी!
ठीक आहे! पण निलेश, आवडत बिवडत नाही ना मी तुला?
आवडतेस, म्हणुन तर आपण चांगले मित्र आहोत!
तस नाही रे!
हा! तस नाहीच! एक मैत्रीण म्हणून मला तू आवडतेस बस त्या पुढे काही नाही.
हं! हं! बर आहे असल तसलं काही मनात पण आणू नकोस.
चले! तुझ्यात काय आहे एवढं आवडण्या सारख!. .
निलेश ! शहाण्या बघतेच तुला थांब!
निलेशने मस्करित केलेला हा उपहास इराने सुद्धा तसेच गंमत समजुन घेतला की नाही अशी शंका निलेशच्या मनात येऊन गेली असावी बहुतेक ऐसे एकंदरीत त्याच्या बोलण्यावरुन वाटुन गेले.  

नियमीत गप्पा, एकत्र येणे - जाने आणि त्यामधून दोघांच्या वागण्यात आलेली सहजता बघता इतर वर्ग मित्रांच्या मनात कुठेतरी पाल चुकचुकत होती. पण ह्यांना विचारणार कोण? 
कॉलेजमध्ये दरवर्षी प्रमाणे डेज (रोज डे, चॉकलेट डे ,,,,,) चे वारे वाहु लागले; आणि कधी नाही ते निलेशने मला विचारले तुझ्या कॉलेज मध्ये मला यायला मिळेल का ह्या दिवसांमध्ये? 
कारे? तुझ्या कॉलेज मध्ये नहीं का कही इवेंट्स वगैरे आणि नवीन ओळखी तर झाल्याच आहेत तुझ्या म इकडे के आहे?
तू सांग रे होऊ शकता का ते बाकीच कळेल तुला. 
शक्कल लढवुन मी नीलेशला माझ्या कॉलेज मध्ये न्हेले खरे आणि त्यावेळी मला नीलेशच्या वर्त्तमान कृतीत आणि भविष्यातील अपेक्षांमध्ये अतिशय विसंगतीची जाणीव झाली.  (मधुरा, अजूण एक मैत्रीण की ?)
हे संपुर्ण समांतर कथानक जे निलेश अनुभवत होता आणि तेवढच रंगवुन मला सांगत होता; मधुरा, इरा, निलेश 
अ! अ ! थांबा, थांबा हे काही त्रिकूट नाही।
कधी, कुठे, कश्या ह्या दोघी एकमेकांना भेटल्या?
हे हळु हळु उलघडत जाइलच, एकंदरीत नात्यातील सगळे पेहलु ह्यांनी कसे हाताळले; निलेशचा दृष्टिकोण काय होता चला जाणून घेऊ. जरा स्वतःल आजमाऊ, ठरवूया नको कोण योग्य की अयोग्य ते, कारण प्रत्येक व्यक्ती ही परिस्थिती नुसार जे योग्य वाटते तशीच वागत असते। आपण फ़क्त तटस्थ राहुन आस्वाद घेऊ. 
असो,
पहिल्या सहामाइक परीक्षेची तयारी जोरदार झाली होती; प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे गेल्या ३-४ वर्षातील प्रश्न पत्रिकांच्या मुलभुत ढाच्यावर बनलेले असते असा सार्वत्रिक समज होता आणि तसे झालेही. परंतु, शेवटच्या विषयाची प्रश्न पत्रीका ही संपूर्ण नवीन प्रकारे बनवण्यात आली. आपली ह्या विषयात विकेट पडणार असे सर्वच बोलत होते. वर्गात फ़क्त १४ जण पास, इतरांच्या वाट्याला ए टी के टी. 
नीलेश ने यादी पडताळली आणि तो वर्गात धावला, भयान शांतता। 
असे काही होणार ह्याची जाणीव सगळ्यांनाच होती, काहींनी मनाची तयारीही केली होती पुढील सहामाई मध्ये पास करण्याची. 
निलेश वर्गात आल्याचे भार्गविन पाहिले, नीलेशचीही नजर तीच्यावर खिळली। 
मान खाली, आवन्डा घेत भार्गविने पुन्हा निलेश कड़े पाहिले आणि सगळ काही ठिक असल्याचा आव आणला. 
शैक्षणिक जीवनातील पहिल अपयश पचवण्याचा धैर्याने प्रयत्न चालु होता, अश्रूंचा झरा काठी आला होता, बांध फुटु न देण्याचा खंबीर यशस्वी लढा निलेशने त्या दिवशी पाहिला। 
काहीही न बोलता निलेश भार्गवीच्या शेजारी बसला होता. 
बिकट परिस्थितीत आपली माणस नुसती जवळ असली तरी लढण्याच बळ येत; हे बळ आधी इराने,किंचीतस निलेशने भार्गवीला दिल.   

निलेशने मस्करित घेतलेल्या विषयाचा इराला सोक्षमोक्ष लावायचाच होता. तिने आणखी कही दिवस घेतले बहुदा स्वताची खात्री करुण घेण्यासाठी की आपल्याला नेमक ह्या नात्याला कुठे घेऊन जयच आहे ते ठरवण्यासाठी. तिकडे निलेश मात्र इराच्या मनातील ह्या कल्लोळातून अलिप्त होता; किंबहुना त्याने जास्त विचार केला नाही त्या संभाषणा नंतर. एके दिवशी कॉलेज ला जाताना इराने अतिशय गंभीर्याने पुन्हा विषय काढला. 
इरा, जरा थांब! , तुला नक्की काय वाटत आहे?
हे बघ, तू एक मुलगी म्हणुन कदाचीत मी जरा जास्त काळजीवाहु वागतो आहे, किंवा नैसर्गिकरीत्या माझ जे वागण आहे ते जवळीक निर्माण करण्या सारख वाटल असेल पण त्यामध्ये वेगळी अशी प्रेम भावना नाही. 
हा, म्हणजे प्रत्येक नात्यात प्रेम हे असतेच; म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तु जसे समजते आहेस तस नाही। पण! मी माझ्या मित्रांशी असाच वागतो. 
आता ह्या पलीकडे जाऊन आणखी वेगळ्या पद्धतीने मी तुला समाजावु शकत नाही।    
आता तूच सांग काय कराव म्हणजे तुला पटेल आणि मलाही समाधान मिळेल. 

निलेश!, मला सतत कोणीतरी सोबत असण्याची सवय नकोय; मला माझ ठरवू दे.
प्रत्येक वेळी तू नसणार आहेस; मला सतत अस वाटत की मी अवलंबुन आहे.
हे नकोय मला कारण मी अशी नव्हते आणि आत्ताही नाही नाही आहे हे पक्क करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. जाणून घ्यायच आहे की मला काय वाटत आपल्या दोघांबद्दल. 
ही निव्वळ निखळ मैत्री आहे की आणखी काही! 
त्यासाठी चांगल होईल पुढचा १ महीना आपण बोलूया नको, विसरुन जाऊया थोडा वेळ ओळख. 
मिश्क़ीलपणे हसत निलेश म्हणाला, मला तर सिनेमा मधील गोष्टी सारख वाटत आहे आणि मी हीरो. हे अस सगळ सिनेमामध्ये होत, एवढ सगळ करुन शेवटी सिनेमात काय होत ते माहीत आहे ना? काय विचार काय आहे तुझा अ! अ! अ!
 निलेश, नालयका ! प्रत्येक वेळी मस्करी कसली सुचते रे तुला.
 हे पटत नहीं आहे इरा पण जर का असे करुण तुझ्या मनातील शंकेच नीरसण होणार असेल तर ठीक आहे.    
दोघांनी ठरवल तर खर पण प्रत्यक्षात तस वागण थोड कठीण जाणार होत कारण हा बदल इतरांना लगेच लक्षात येऊ लागला होता. निलेशच ठाम होत काहीही झाल तरी बोलायला जायच नाही.  बऱ्याच वेळा इरा समोर असताना सुद्धा जणूकाही ती नाहीच आहे असा वागत होता.  दोघांच्या वागण्यातील बदल स्पष्ट दिसत होता, वर्गातील इतर मुलींकडून विचारपुस नक्कीच झाली असणार इराची.  
निलेश, बोलायच नाही ह्याचा अर्थ असा नाही की मौन पाळायच! अनोळखी माणस सुद्धा बोलतात की. 
अच्छा! मग काय बोलायच तेही सांग आता.   
अस सोयीस्कर वागने दोघांनाही पटत नव्हत पण कोणा - कोणाला समजावणार म्हणुन थोडी तडजोड झाली; त्यातही इराने पुढाकार घेतला म्हणून आणि अधिक भर म्हणजे कधीही ह्या दोघांशी वैयक्तिक विषयावर न बोललेले वर्गमित्र आता त्यांना विचारत होते; तुमच्या दोघात काही वाद अथवा काही बिनसल आहे का ते.   


भेट झाली नेहमी अशी कि जणू पहिलीच भेट ही,
बोलणे झाले काही, नी समज झाला काही,
पुढच्या भेटीच्या आशेपाई आज हरवला तो एक क्षण.....

हसरे-बोलके चेहरे अनेक भेटले,
गंमती-जमती सुद्धा अनेक ऐकल्या,
ह्या धुंद लहरींमध्ये आज हरवला तो एक क्षण.....

झेपावलो स्वप्नांच्या वाटेवरती,
मनात होती भेटीची स्पुर्ती दिसणाऱ्या त्या वळणावरती,
क्षितिजा कडे जाता जाता आज हरवला तो एक क्षण.....

आठवण येत त्या हरवलेल्या क्षणांची,
रंगवलेल्या त्या चित्रांची,
आज हरवतो आहे हा एक क्षण.....


13-jan-2012